शोध...!
शोध...!
दूर अचानक दिसलीस मज तू
फिरले मग सारे ऋतू
मम् प्रेमाचा विशाल सागर तू
कळेल का गे फुलता वसंत ऋतू
शरद चांदणे बघ वाट पहाते
हृदयी माझ्या प्रीत जागते
कोजागिरीच्या चांदण्याची
मला ग सारखी ओढ लागते
त्या अर्ध्या अतृप्त तेची
सल अजुनी सलते ग
वेडावले मन माझे
आजही तुलाच शोधते ग .....!