ओढ
ओढ
ओढ ही अनामिक
लागली जीवाला
आवरू कसे सांग,
या भाबड्या जीवाला
वचन तुझे आठवून,
घेते मी श्वास उसना!
तू येशील ही आस,
बघ लागली जीवाला
तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात
एक कप्पा माझा असू दे,
कायम तुझीच स्पंदने होऊन,
जपेल तुझ्या जीवाला
तुझ्या मिलनाची
आस ही कशी रे!
जाईल प्राण-पाखरू होऊन
घे कवेत ह्या जीवाला
तुझी साथ वाटे जणू
जन्मोजन्माची
मी राधा अन् तू शाम
का भासे या जीवाला
आता सोड ना बहाणे
बघ चंद्र ही सांगतो
घे मिठीत या चांदणीला
दे दिलासा काही या जीवाला

