STORYMIRROR

Kishor Zote

Romance

3  

Kishor Zote

Romance

आभास (सहाक्षरी)

आभास (सहाक्षरी)

1 min
188

तीच हुरहूर

उगाच मनाला

उगा पाठमोरे

तुला पाहण्याला


मंजुळ आवाज

तुझ्या पैंजणाचा

तो कानी गुंजतो

तुझ्या हासण्याचा


पापणी मिटता

तुच दिसे सदा

लय भारी वाटे

प्रत्येक ती अदा


असावी जवळी

साथ फक्त तुझी

तुझ्याच हृदयात

धडधड माझी


भासतो आभास

छळतो ग मला!

विरह माझा हा

कळेल का तुला?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance