STORYMIRROR

Ashwini - Mishrikotkar

Romance

3  

Ashwini - Mishrikotkar

Romance

नाते जन्मांतरीचे

नाते जन्मांतरीचे

1 min
279

नात्यांचे झाले मिलन

गाठ जुळली प्रेमाची

सात जन्मांची सोबत

साथ हवी विश्वासाची


नाते हे जन्मांतरीचे

झाला जीव एकरुप

कुटुंबाचा भार पेलू

झाले तुझ्या अनूरूप


चांदण्या रात्री बरसे

प्रीताचा गंध फुलेल

अबोल हा सहवास

हरवून मी बसेल


सुख दुःखाचे हिंदोळे

अलवार माझे मन

झोके घेईल त्यावर

हळुच घाल फुंकर


नात्यांची नाळ जुळली

धागे जुळले प्रेमाचे

तु मी करता करता

भाव दाटले शब्दांचे 


मन हे भिरभिरते

आशा इच्छा आकांक्षाचे

तृप्त मी तुझ्या मिठीत

जीवन माझे सुखाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance