आई
आई
आई नऊ महिने वाढवी
आई बाळाला जन्म देई
आई बाळाचे संगोपन करी
आई बाळा अंगाई गाई ......१
आई बाळाचे बोट धरी
आई बाळाचे बोल बोलती
आई चालणं शिकवी
आई मायेचा पाझर असती........२
आई जीवाचा जिव्हाळा
आई हाताचा पाळणा करी
आई बाळा जोजविण्या
आई रात्रभर जागरण करी.......३
आई संस्काराचे पाठ देती
आई जीवन जगण्या शिकवती
आई म्हणजे वडासारखा आधार
आई संघर्षाला तोंड देती......४
आई तू सर्वगुणसंपन्न
आई तू ममतेचा सागर
आई तू विद्या ज्ञानदा
आई तू करूणेचा आगर.......५
आई तू माझी गुरू
आई एकमेव देव
आई ची पुण्याई
आई कायमची ठेव........६
आई म्हणजे अखंड झरा
आई म्हणजे वाहते पाणी
आई आपल्या बाळासाठी
आई च गाते अखंड गाणी......७
आई म्हणजे वटवृक्ष
आई म्हणजे हक्काची सावली
आई विना जगतात नाही
आई च्या लेकरांचा वाली......८
आई म्हणजे वाहणारी नदी
आई म्हणजे नितळ पाणी
आई च्या अखंड प्रेमाला
आई चीच मेजवाणी......९
आई म्हणजे अन्नपूर्णा
आई म्हणजे काळजी
आई चं घरातल्यासाठी
आई बनते प्रसंगी आजी....१०
आई भक्कम पाया
आई मनाची एकाग्रता असते
आई सर्वांची मजबूत भिंत
आई गालावरची पापी असते.....११
आई जीवन संगिनी तू
आई माझी तू विधाता
आई तू आरोग्य दायिनी
आई तू कर्ता करविता......१२
