क्रांती सूर्य
क्रांती सूर्य
क्रांती सूर्य एक तेजस्वी तारा
१४ एप्रिलला जन्मलेला
रंजल्या गांजलेल्या सर्वांना
बाबासाहेबांसारखा तेजस्वी सुर्य लाभला
जाती पातीचे तोडले पाश
मानवतेचा धरला ध्यास
प्रभुची लेकरे आहोत सारी
हाती धरली एकतेची कास
लढले, झगडले दीन दुबळ्या़ंसाठी
कायद्याच्या चौकटीत राहून
केला प्रतिकार गोरगरीबांसाठी
आसमंत निळा कवेत घेतला
अन्यायाविरुद्ध लढा पुकारला
लढा लढूनी माणुसकीचा
दुष्मनांना मजा चाखला
केले महान कार्य आणि विचार
जनतेच्या होते जीवाचा प्राण
राज्यघटनेचे शिल्पकार बनले
शब्दांचे चालविले तुम्ही बाण
