मी अनुभवलेला पाऊस
मी अनुभवलेला पाऊस
संगे पावसाच्या सरींनी
झाकायली सृष्टी सारी
तृप्त झाली अवनी आता
निसर्गाची किमया भारी....१
पावसाच्या लडीवर सरींनी
बालपणीचे स्मरण होईल
साचणाऱ्या डबक्यात माझी
कागदाची नाव पैलतीरी जाई....२
अवघड पाऊस आणि मी
तारुण्यात भिजून जाई
सुखात नाहून निघण्या
जीव कासावीस होई.....३
आठवणी होती गोळा साऱ्या
येती पावसाच्या धारा
चराचरात नांदू दे
सौख्यसमृद्धीचा वारा.....४
हृदयात वाजे वेणू
लहरी उठती प्रेमाच्या कडे
नकळत सारे बदलले
थेंब पावसाचा भुवरी पडे......५
नदी नाले ओसंडून आहे
श्वास मोकळा होतो त्यांचा
पशुपक्षी नांदेड सुखाने
वाहेगंध रानफुलांचा...६
कधी अवघड कधी अल्लड
कधी रिमझिम तर कधी संथगती
लपंडाव चाले ढग आणि विजेचा
खेळ खेळूया अंगणात भोवती....७
