माझी आई
माझी आई
आठवते ती मला,
होतात डोळ्यांच्या कडा ओल्या
गेलीस दूर निघून ,
यातना किती सोसल्या,.......1
कष्ट केले तरीही,
नाही हौसमौज झाली
कुटुंबासाठी मात्र
अहोरात्र तू झटली,.......2
केला हातांचा पाळणा,
गाईली तू अंगाई
माय माझी तू
मला सोडून गेली......3
तुझ्या कष्टांची परतफेड
मी कधीच नाही केली
साडी चोळी देण्याची
माझी इच्छा अपूर्ण राहिली....4
आले कितीही संकटे,
नाही सोडीली साथ तू
संसाराचा रथ हाकण्या ,
सावली बनून उभी राहिली तू....5
संस्कारांचे बाळकडू पाजले,
आमचे आयुष्य मार्गी लावले
जीवन संघर्ष करण्या,
आम्हा ज्ञानरूपी अमृत पाजले.....6
आई माझी मैत्रीण असशी
सुखदुःखाची जाणीव ठेवी
तू अंधाराचा प्रकाश झाली
तुझ्यासारखी ममतेची सर नाही यावी...7
आई माझी तू ,
तुझी कदर नाही झाली
तुझ्या आयुष्याची संध्याकाळ
अशीच विरत गेली....8
