अस्तित्व
अस्तित्व
तेवत ठेवी पणती
प्रकाश घराला देई
तुझ्याच मुळे चैतन्याचा
मळा घरात फुलून येई....१
तू आत्मा असते घराचा
श्वास आहे प्रत्येकाचा
अधरांवरी येते पुन्हा
लाडके शब्द तुझ्या प्रेमाचा....२
लेक या घराची
आधार तूच बापाचा
आरसा तूच समाजाचा
प्रतिबिंब खरे पणाचा....३
जिजाऊ आणि सावित्रीच्या
लेकी या महाराष्ट्राच्या
पावलांवर पाऊल पुढे जाऊन
अभिमान ठेवू स्त्रीच्या अस्तित्वाचा.....४
वंशवेल वाढविण्यासाठी
स्त्रीचे स्थान महत्त्वाचे
नका समजू तिला अबला
हे दुर्दैव नाही मनुष्याचे....५
खंबीरपणे उभी राहते
सामना करण्या संकटांचा
संसार सुखाचा करूनी
तोल सांभाळते सासर अन् माहेरचा....६
नका झुडूपात टाकू तिला
नकोशी वाटली तरी
हक्काने जगण्याचा तिला
याचे भान ठेवा अंतरी...७
