माती
माती
सुगंध या मातीचा, मनास गहिवरतो
महाराष्ट्रातील परंपरांचा, नाद गुंजतो
संतांच्या चरण स्पर्शाने पावन ही भूमी
छत्रपतींच्या पराक्रमाने ,शत्रु ही ठरले कुचकामी
पवित्र नद्या अन् , सह्याद्रीच्या कडाहि गहिवरल्या
कवी , लेखक, गायिकांचा आवाज गडगडला
जाती, पातीच्या, धर्म , भेदभावाच्या
नका चढवू भिंती,
माणुसकीचा झरा पाझरू दे
राहील मनात प्रिती
एकमेकांच्या भावना ओळखून,अश्रु डोळ्यांतले पुसशी
मदतीचा हात पुढेच करूनी, म्हणू आम्ही आहोत पाठीशी
