मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
1 min
194
भिजलेल्या भुधरेला,
हिरवे रूप मिळाले
पावसाच्या त्या थेंबाने
मनही चिंब भिजले....१
मृदगंध पावसाचा
दरवळला नभात
या चराचरात नांदते
चैतन्य हि सुखात....२
ओढ लागते पावसाची
तहानलेल्या चातकासारखी
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
संत तुकारामांच्या अभंगासारखी.....३
काळे आभाळ दाटले नभी
घनघोर वारा सुटला
निसर्गाच्या या पावसाच्या थेंबाने
मोर पिसारा फुलवून नाचला....४
कोरडी मातीही सुखावली
घटाघटा पाणी प्याली
भेगाळलेल्या त्या कडांमधूनी
ओली चिंब भिजून गेली....५
ओढे, नाले , नदी सारे
धबधबे हे कोसळणारे
दोन जीवांच्या मिलनासाठी
हे सुखाचे क्षण हसणारे....६
