आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच
आयुष्याच्या रंगमंचावर
चालतो नियतीचा खेळ
थोडे सुख वेचून घेऊ
साधून आनंदाचा मेळ.....१
भुमिका अनेक निभावतांना
अनेकदा आपला तोल जातो
एकमेकांना समजून घेण्यासाठी
मनुष्य जन्म अपुरा पडतो ....२
आयुष्याच्या ऊन सावलीत
स्त्री पुरुष हा भेदच नसतो
गृहिणी असो किंवा कमावता
प्रत्येक क्षणी परीक्षाच देत असतो....३
सुख हेलकावे खात येते
दुःख वाऱ्याच्या वेगाने येते
नकळत सुखाचा संसार
उध्वस्त करून निघून जाते....४
मात करून संकटावर
मुखवटे वेगवेगळे घालून
पडद्याआड गेल्यानंतर
क्षणात जाईल विरून....५
औचित्य साधून सणांचे
एकमेकांच्या सानिध्यात राहू
कुटुंबाची सुख, शांती, अन् समाधान
यात सर्वांचे हित पाहू....६