मनाची चाहूल
मनाची चाहूल


मृगजळाच्या कस्तुरीलाही
लाजवेल असे पावसातल्या
दवबिंदूतले अत्तर आहेस तू...
माझ्या मनातल्या प्रत्येक
कवितेचे अक्षर आहेस तू...
माझ्या ओळखीची की
अनोळखीची माहित नाही
पण खूण आहेस तू...
कदाचित, ती खूण म्हणजेच
माझ्या मनाची चाहूल आहेस तू...