अशी ही भारतीय संस्कृती
अशी ही भारतीय संस्कृती


इथे धर्म पंथ जात
एकोप्याने नांदती
निरनिराळ्या भाषांची येथे
जणू पाककृती
कणकण मातीचा बोले
अशी ही भारतीय संस्कृती
जिथे भाषा नांदते
तिथे संस्कृती रांगते
संपन्न हा इतिहास आमचा
प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
कणकण मातीचा बोले
अशी ही भारतीय संस्कृती
देश प्रेमाचा साक्षीदार जाहले अनेक
आजही येते पंजाब सिंध गुजरात
मराठा जाणती हेच आमचे रिती
कणकण मातीचा बोले
अशी ही भारतीय संस्कृती
छत्रपतींचे स्वराज्य इथले
तिथेच लढली राणी झाशीची
अनेक दि
सने लोटली तरीही
तशीच ताठ मानेने उभी आहे
आजही आमची संस्कृती
कणकण मातीचा बोले
अशी ही भारतीय संस्कृती
वेदांचे लाभले सौभाग्य आम्हास
विचारांत सदैव संतांचे ध्यास
मातृभूमी करिता सर्वस्व पणाला
लावू अशी आमची प्रीती
कणकण मातीचा बोले
अशी ही भारतीय संस्कृती
वसुधैव कुटुम्बकम असा विचार आमुचा
गंगा-गोदावरी यमुनेचा आजही
दरवळे सुगंध एकोप्याचा
अशी आमची पावन धरती
कणकण मातीचा बोले
अशी ही भारतीय संस्कृती