Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Urmila More

Others

4.0  

Urmila More

Others

प्रगतीचे दिवस करता करता..

प्रगतीचे दिवस करता करता..

1 min
451


कलियुग सुरू होईल म्हणता म्हणता एक नवीनच युग आलं, 

प्रगती करता करता सगळं मोबाईलचं युग झालं.


मैदानी खेळात दिवस घालवणारी मुलं डिजिटल फुटबॉल खेळू लागली,

रोजच्या कट्ट्यावरच्या मित्रांची मैफिल आता व्हाट्सअप ग्रुप वरच दिसू लागली.


सणासुदीला एकत्र येऊन साजरे होणारे सण आता फॉरवर्ड मेसेज वरच साजरे झाले,

लास्ट इयर ची मेमरी शेअर करत चेक करतात किती लाईक आले.


विचार करण्याची क्षमता आमची संपुष्टात गेली ,

गुगलने सगळी कामं जी सेकंदातच केली.


दर महिन्याला येणारे पोस्टमन काका आणि त्यांचे पत्र आता नाहीसे झाले,

प्रगतीच्या युगात म्हणे जी मेल इमेल प्रिय झाले.


लहानपणी अंगाला येणारा मातीचा सुगंध आणि ,

सातच्या आत घरात येण्याचे बंध आता संपून गेले.


आईचा पदर धरून चालण्याचे, हट्ट करण्याचे ,

मोठ्यांनी आणलेला खाऊ ते दूर गेल्यावर फस्त करण्याचे,

आईचे पत्र- संत्रा लिंबू- लपंडाव खेळण्याचे ,आईच्या कुशीत आजीच्या गोधडीत निजण्याचे ते दिवस आता सरून गेले.


आणि..

प्रगतीचे दिवस करता करता मोबाईल चे युग सुरू झाले.


Rate this content
Log in