कळलंच नाही..
कळलंच नाही..


पुस्तकांमध्ये मन घालून
कायम अभ्यासात गुंतलेली
कधी तुझ्या कल्पनांमध्ये गुंतायला लागली
कळलंच नाही...
कधी बावरलेली, कधी घाबरलेली
कोणाशी ही न बोलणारी
कधी तुला नुसतंच आठवून तुझ्याशी बोलायला लागली
कळलंच नाही...
पुस्तकं वाचून ती समजून घेणारी
कधी त्या पुस्तकाच्या कथांमध्ये
तुला शोधायला लागली
कळलंच नाही...
अक्षरांशी मैत्री तर होतीच पण
कधी ते प्रत्येक यमक जुळवताना
कविता करायला लागली
कळलंच नाही...
नुसतंच स्वप्नात नाही तर सत्यात
तुला पाहिल्यावर गोंधळलेली
कधी तुझ्या आठवणींमध्ये हरवून
तुझ्या प्रेमात पडायला लागली
कळलंच नाही...