तुझ्या प्रेमाचा रंग..
तुझ्या प्रेमाचा रंग..

1 min

398
तू समोर असलास की शब्दांना
दिशाच देता येत नाही मला
खरतरं सांगायचं असतं रे
बरंच काही तुला..
सांगायचं असतं तुला की खूप प्रेम
आहे माझं तुझ्यावर
पण बऱ्याचदा तुला पाहून
निःशब्द होते...
आणि कोऱ्या कागदावर भावनांना
शब्दांच्या साहाय्याने वाट
मोकळी करून देते
निळ्या शाईमध्ये गिरवलेल्या
सरळ शब्दांना कागदावर पुन्हा तोच रंग येतो
जो आजवर फक्त माझ्या मनात दडून होता
तुझ्या प्रेमाचा रंग..