अबोल प्रीत..
अबोल प्रीत..


आपली पहिली भेट काही चित्रपटांमध्ये दाखवतात तशी नव्हती झाली...
माझी ओढणी तुझ्या हातात अडकली नाही..
समोरून गेल्यावर आपण वळूनसुद्धा पाहिलं नाही..
अचानक एखादं गाणं पण वाजलं नाही..
एवढंच काय तर कधी एकमेकांशी बोललो ही नाही..
तरी ह्या अबोल प्रीतीत आपली मन जुळली असं वाटतं
कारण तुझ्या डोळ्यात मला फक्त मी नाही दिसत तर एक अबोल प्रेम दिसत..
जे खूप काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत..
आपल्या भेटीत आपण कधी पावसात भिजलो नाही..
कारण आपल्या प्रेमाचा साक्षीदार तो पाऊस कधी झालाच नाही..
पण तो येऊन गेल्यावर मातीतून दरवळणारा
सुगंध का
कुणास ठाऊक तुझी आठवण देऊन जातो..
ती ओलीचिंब झाडं प्रत्येक थेंबातून तुझा स्पर्श जाणवून देतात..
आणि मग मधेच येणारा उनाड वारा काहीतरी गूज सांगुन जातो...
ज्यात मला पुन्हा तुझ्या अबोल प्रीतीचा भास होतो..
मागे वळून न पाहणं..
कधी एकमेकांचा स्पर्श न होणं..
पण तरीही अबोल प्रितीच गाणं मनापर्यंत पोहोचणं..
आणि का एकमेकांना पाहिल्यावर हृदय धडधडणं...
तू एक दिवसही नाही दिसलास की मन कासावीस होण..
अशी आपली अबोल प्रीत..
शरीराने नाही तर मनाने जवळ आणणारी..
आणि मला तुझ्यावर जीवापाड प्रेम करायला लावणारी..
अशी आपली अबोल प्रीत....