आज पुन्हा एकदा..
आज पुन्हा एकदा..


दररोजच्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून
तुझ्या आठवणींमध्ये गुंतावसं वाटलं,
गर्दीतून चालताना पटकन तुझा हाथ धरून
तुझ्यासोबत चालावसं वाटलं
हो... आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं.
तेव्हा जे सांगता आलं नाही ते
आज सगळ्या जगासमोर
ओरडून सांगावस वाटलं
हो....आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं.
">नेहमीप्रमाणे तुझ्याकडे चोरून बघावंसं वाटलं
तुझ्या सगळ्या आठवणींना आणि
कल्पनांना सत्यात पाहावंसं वाटलं
हो... आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं.
आपण आधी जेव्हा भेटायचो तेव्हा
आपल्यात शब्द कमी आणि
शांतता जास्त बोलायची
पण.., आज त्या शांततेला बाजूला
सारून तुझ्याशी मनमोकळ्या
गप्पा माराव्या असं वाटलं..
हो... आज पुन्हा तुला भेटावसं वाटलं.