तुला पाहताना
तुला पाहताना
मी माझा राहिलीच नाही
क्षण एक तुला पाहताना
ओठावरच्या शब्दांना
मुकेपण आले तुझ्याशी बोलताना
मी खूप केेेेला प्रयत्न
स्वतःला सावरायचा
तुझ्याशी बोलताना
भावनांना आवरायचा
मी गुपित लपवलं डोळ्यात
पण शब्द ओठावर घुटमळले
डोळे झाले ओले
अन् सर्वकाही तुज उमजले

