STORYMIRROR

Shweta Udamale

Romance

3  

Shweta Udamale

Romance

सूर छेडता मनाचे...

सूर छेडता मनाचे...

1 min
301

अलवार साधुनी जवळीक,

छेडल्यास तू तारा या मनाच्या...

उमटले शहारे अंगावर अन्,

जपले नाव कप्प्यात हृदयाच्या...


तुझ्या एका हास्यानेच प्रिया, 

तरंग उमटतात माझ्या मनात...

खुळे मन हे माझे मग खूप,

नाचायला लागते आनंदात ...


जशी राधा झाली रे बावरी,

ऐकूनी सूर कृष्णाच्या बासुरीचे...

धुंद न्हाली प्रेमात सावळ्याच्या, 

सूर छेडताच राधाच्या मनाचे...


अगदी तसेच माझ्या स्पंदनात,

तुझेच रे सख्या राज्य आहे....

दूर सोडूनी गेला तू मला मात्र,

हे मन तुझीच खूप वाट पाहे...


प्रेमसंगीत वाजती मनात माझ्या,

अन् त्याला विश्वास, मायेची जोडी...

गाऊ मिळून जीवन गाणे आपुले,

आणि वाढवू या संसाराची गोडी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance