मन माझे...
मन माझे...
मन हे माझे वेडे,
तुझ्या मागे पळते...
असंख्य भावना त्यात,
मी साठवून ठेवते...
वाटते कधी मनाला,
यावे तू पावसाच्या थेंबात...
मनसोक्त मी भिजावे अन्,
न्हाहून निघावे त्या प्रेमात ...
खुळे मन हे नुसते,
तुझ्याच विचारात असते...
ऊन असो वा पाऊस,
सर्वांमध्ये तुलाच शोधते...
खूप पाहिली आहे मी वाट,
ये आतातरी बाहेर मनातून..
देवानेच बनवली असेल ही,
आपली जोडी ग स्वर्गातून..
सुंदर प्रेम हे मनातलं माझं,
नेहमीच घालत मला साद...
आण घेऊन सांगतो सखे,
नाही होणार आपल्यात वाद...

