जगू कशी तुझ्याविना
जगू कशी तुझ्याविना
1 min
64
कसे जगू तुझ्याविना,
जन्म तू आई दिलास
दिला आधार प्रसंगी,
बाबांनीच चालण्यास
आला अखेर दिवस,
आज माझ्या लग्नाचा
मंगलाष्टकेही झाली,
थाट मग जेवणाचा
कंठ माझा दाटून हा,
आला आईला पाहून
बाबा डोळे पुसतात,
कोपऱ्यात त्या लपून
सर्व पाहुणे समोर,
आम्हांवर त्यांचे लक्ष,
आई बाबा भाऊ मात्र,
पाहुणचारात दक्ष
भांडणारा भाऊ मग,
मला लपून गं पाही
सुखी ठेवा बहिणीला,
नवरदेवाला सांगी
क्षण पाठवणीचा,
आला अखेर लग्नात
झाले सर्वच भावुक,
लग्नाच्याच मांडवात
आई रडली खूप नि,
घोर बाबांच्या जीवाला
सोडताना माहेर हे,
कसे आवरु मनाला
