( मैत्री )
( मैत्री )
1 min
179
मैत्री आपल्या दोघांची,
जपू हो जिवाभावाने...
नाही तुटणार नात,
कुठल्याच कारणाने...
आहे विश्वास,आदर,
आपुलकी प्रेम यात...
येत नाही हो आडवी,
मैत्रीमध्ये वर्ण,जात...
दुःख असल्यास पाणी,
डोळ्यामध्ये तरळत...
हर्ष असला मनी की,
तेच मन खिदळत...
नको दिट लागायला,
याच मैत्रीच्या नात्याला...
मैत्री तुटण्याच भाग्य,
नको कोणाच्या वाट्याला...
कृष्ण सुदामा सारख,
नात मैत्रीच असावं...
पण मात्र मैत्रीत ते,
घर गर्वाच नसावं...
