दूर डोंगराच्या पायथ्याशी...
दूर डोंगराच्या पायथ्याशी...
अगदी दूर डोंगराच्या पायथ्याशी,
असेल माझ्या स्वप्नातला राजकुमार...
येईल अकस्मात आयुष्यात अन्,
उघडेल माझ्या या हृदयाचे दार...
असते सर्वांना आवड त्याच,
आलिशान असणाऱ्या शहराची...
मला मात्र ओढ त्या छोट्टयाश्या,
दूर असलेल्या डोंगराच्या पायथ्याची..
असेल साधा भोळा अगदी,
नसेल त्याला हवा दुष्कर्माची...
सुकर्मासोबत जुळली असेल,
नाळ त्याच काळ्या मातीची...
डोंगराच्या पायथ्याशी त्या,
असतील लोकांची छोटी घरे...
घर जरी ते छोटे असलेले पण,
मनाला त्याच्या फार मोठी दारे..
आहे इच्छा मनात एक छोटी,
जावे दूर डोंगराच्या पायथ्याशी...
विसरून सारे त्राण अन् दुःख,
करावी सलगी तिथल्या हवेशी...
