एकांत
एकांत
नीलकाशी या सायंकाळी,
मंदिरामध्ये ग सखे बसून...
पाहतोय मी सुंदर रूप तुझ,
पाण्यातल्या प्रतिबिंबामधून....
साडी तुझी सोनचाफा जणू,
अन् झब्बा माझा श्वेत रंगी....
पाहूनी ग तुझे हे सौंदर्य,
घेई माझे ते मन वेधूनी...
बसलो अगदी एकांतात आपण,
रेखाटतो सुंदर स्वप्न आपुले...
या ऐतिहासिक मंदिराच्या साक्षीने,
देतो वचन करू संसार जोडीने...
हा निसर्ग आहे ग साक्ष,
आपल्या सुंदर नात्याचा...
होणार नाही अंत कधी,
आपल्या निःस्वार्थ प्रेमाचा...
शांत एकांतात आपण.
हरवूनी जावू दोघे...
लक्ष्मी नारायणासारखी,
जोडी आपली शोभे...

