विरह
विरह
बहरलेल्या आपल्या प्रेमफुलात अशा,
दरवळत होता ना सुगंध मायेचा..?
सडा पडायचा भरघोस विश्वासाचा,
मग आवडल्या कागदी कळ्या कशा...?
माझ्या प्रत्येक प्रार्थनेत फक्त तू होतास,
बिन प्रार्थनेचा मग तिचा झाला कसा...?
मी वेडी तर जपत राहिले प्रेमाचा वसा,
का आयुष्याच्या वळणाहून दूर गेलास?
जगायचे आधी मी तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
का अचानक विरह नभ आकाशी दाटले..?
जगते आता मी आता तुझ्या या विरहात...
आजन्म प्रेम तुझे मला तर नाही लाभले,
अचानक येता जाग,तुला माझ्या सोबत पाहिले
होते वाईट स्वप्न समजता,आनंदाश्रु हे वाहिले...

