दाह जीवनाचा
दाह जीवनाचा
1 min
231
बाल्यावस्थेतच,
बा सोडून गेला...
लगेच आईचा,
श्वास बंद झाला...
जबाबदारी ही,
आली अंगावर...
लेकरे पडली,
ती उघड्यावर...
शिक्षणही माझे,
झाले मग बंद...
अपूर्ण स्वप्न हे
हीच मनी खंत...
येते डोळा पाणी,
स्वप्न ती मोडली...
नातेवाईकांनी,
साथ ही सोडली...
