हिवाळा
हिवाळा
हिवाळा हा ऋतू असतो,
सर्वांच्याच खूप आवडीचा...
म्हणतात या गोड ऋतूला,
ऋतू हा गुलाबी रंगाचा...
निल आकाशी पसरलेले,
सकाळचे हे शुभ्र धुके...
या समोर ते बर्फाचे राज्य,
हिमालय ही पडे फिके...
जेवढा वाटतो तेवढा सुंदर हा
खरंच असतो का ओ हिवाळा...?
रस्त्यावर राहणार्यांच काय होत ?
विचारा एकदा स्वतःच्या मनाला...
करावी आपण त्यांना थोडी मदत,
द्यावे त्याना निदान जुने कपडे...
घेतोय थंडीचा आनंद आपण पण,
पडलेत बाहेर काही पोर उघडे...
असतात ही पोर उघडी तर कधी,
असतात ठिगळाच्या त्या गोधडीत...
काय चूक पण त्या लहान पिल्लांची,
लिहलंच आहे हे त्यांच्या बंद मुठीत...
गुलाबी थंडी चा हा गार ऋतू,
व्हावा खऱ्या गुलाबी रंगाचा...
तोच रंग पसरावा गाली अन्,
दिसावा त्यांचा चेहरा आनंदाचा...
