पतंग रंग
पतंग रंग
*" पतंग रंग "*
पतंग उडतो
उंच तो आकाशी,
नाते त्याचे असे
खाली जमिनीशी!
किती किती रंग
तांबडा, पिवळा,
भगवा, हिरवा,
पांढरा नी निळा!
बुढ्ढंग, भडंग,
अटेपटेदार,
पोण्या, डोळेदार,
घार, मथ्थेदार,
तुक्कल, पैचुडी,
सपोळा, वावडी,
नी खाटवावडी!
कितीक प्रकार!!
उडे पक्ष्यासवे,
होई मोद किती!
इजाळता पक्षी,
देई दुःख अती!
दुसरा पतंग,
उडतो दिव्याशी!
प्रित दाखवत,
जातो जीवानिशी!
तिसरा पतंग,
झाड एक लाल!
उगवतो उंच,
होण्यास गुलाल!
चवथा पतंग,
खोल अंतरंग!
कधी अंतरक्षी,
कधी तो अथांग!
खेळ ही पतंग,
जीव ही पतंग,
वृक्ष ही पतंग,
मन ही पतंग!
उडती आकाशी,
बुडती तळाशी,
कधी जीवानिशी,
असे हे पतंग!!

