STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Children Stories Comedy

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Abstract Children Stories Comedy

पुन्हा घ्या मोबाईल हाती

पुन्हा घ्या मोबाईल हाती

1 min
10

उषःकाल होता होता

झोप पुन्हा का लागली

अरे ऊठा सत्वर तुम्ही

पुन्हा घ्या मोबाईल हाती


जागवल्या किती राती

नाही वाटलीच भीती

पाहिल्या त्या चित्रफिती

पुन्हा घ्या मोबाईल हाती


सोडून दिला रोजगार

सोडून दिली ती शेती

मनोमन एकच प्रीती

पुन्हा घ्या मोबाईल हाती


मागू भिक रिचार्जसाठी

त्याचसाठी जोडू नाती

आयुष्याचे करा वाटोळे

पुन्हा घ्या मोबाईल हाती 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract