लोणचं
लोणचं
सुटत जाते,
तोंडाला पाणी
जेव्हा करते,
लोणचं, राणी!
आंबट गोड,
कैरीची फोड
मिरची, लिंबू,
नाहीच तोड!
हिंग, मोहरी,
फोडणी दिली
तडतडत्या,
गरम तेली!
भरे बरणी,
चिनीमातीची
मुरत ठेवी,
फडताळात ती!
सुटत जाते,
तोंडाला पाणी
जेव्हा करते,
लोणचं, राणी!

