STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Action Classics Inspirational

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Action Classics Inspirational

शब्दांत मांडता येत नाही

शब्दांत मांडता येत नाही

1 min
186


दुःखास मोजता येत नाही

शब्दांत मांडता येत नाही


कित्येक संकटे झेललेली

नियतीस भांडता येत नाही


संसार थाटला एक आम्ही

मांडून मोडता येत नाही


घेऊन आण मी प्रेम केले

खोटेच बोलता येत नाही


आखून ठरवला मार्ग माझा

केव्हाच खोडता येत नाही 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action