अबोल प्रेम
अबोल प्रेम
आठवण येताच यायचो भेटीला
सहवास तुझा लाभण्यासाठी
उगाच कोडी गोष्टींची गुंफण
फक्त तुला न तुला पाहण्यासाठी ॥१॥
नेहमी असायचे तुझे बहाणे
तरीही आतुरतेने धावत यायचो
रुसवे फुगवे किती तराणे
पण प्रेमापुढे हतबलअसायचे॥२॥
फोफावत आली खबर मजला
तुझे चालू झाले वरसंशोधन
गडबडलो पण लगेच सावरलो
देवासमोर घातले लोटांगण ॥४॥
मनीचे भाव लगेच पोहोचवले
उधाण पुरे रितीभातींचे
अव्वल प्रेम मार्गी लागले
गाडे चालू झाले संसाराचे ॥५॥

