विषय -संस्क्रृती
विषय -संस्क्रृती
शब्द -कुटुंब, जोड, वेळ
आजीचा बटवा
गोष्टींचा खजिना
प्रेमाचा गोडवा
कुंटुब एकता॥१॥
बाळांचा जोजवा
सुखाची ही जोड
एकीचा विसावा
तृप्तीची ढेकर ॥२॥
वेळेचा सांगावा
महती मनुजा
एकत्र रहावा
समाज अपुला॥३॥
प्रेमाचा मुलामा
मायेची संगत
सतत रहावा
मोठ्यांचा आशिष ॥४॥
सन्मान जपावा
संस्क्रृती महान
बालका चालवा
सांगे परंपरा ॥५॥
