STORYMIRROR

Swarup Sawant

Others

4  

Swarup Sawant

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
358

 सोड भूतकाळ आता

अंधश्रद्धा पलीकडे 

मांजर आडवे जाता

नको जाऊ अलिकडे॥१॥


नको जाऊ सती आता

वाट चाल जिवनाकडे

मुलगी जन्मास येता 

हासूनि जा लक्ष्मीकडे॥२॥


लिंबू मिरची तू लावता

जंतनाशके दाराकडे

भ्रम दु:शक्ति पळवता

मानू नको मनाकडे॥३॥ 


विज्ञानाचा मार्ग दावता

निराकरणाचे साकडे

शंकाकुशंका सोड आता

जा नि:शंक ज्ञानाकडे॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन