विषय- क्रांती
विषय- क्रांती
1 min
466
विषय- क्रांती
शब्द-गाव
पण सांगते व्यथा
कधी नाही पाहिली॥१॥
मुली जन्माची गाथा
जन्माआधी मारिली
परंपरा म्हणूनि
संस्क्रृती रुजविली ॥२॥
आली नविन क्रांती
वादळासम आली
भ्रूणहत्येस बंदी
स्री जन्मास आली॥३॥
माणुसकी ,संस्कृती
न्याय घेऊन आली
मुलासम मुलगी
दिवा घेऊन आली॥४॥
मुली नव्हे संकट
लक्ष्मीरूपे जन्मली
मायेचा ती सागर
अवनी अवतरली॥५॥
सन्मान तिचा राखा
जननी विश्वातली
पंरपरेची शान
दुर्गा ती जन्मा आली॥६॥
