STORYMIRROR

Swarup Sawant

Others

3  

Swarup Sawant

Others

विषय-माझी शाळा

विषय-माझी शाळा

1 min
255

असेच एक दिवस

वळले ते शाळेकडे

माय मराठीची शाळा

ओढ लागे जीवाकडे ॥१॥


 तबला करु ती बाके

मित्रसखे ते चहुकडे

शोधीते आनंद सारा

विसरे ना दिसे गडे॥२॥


गरज म्हणूनि सांगे

वळले इंग्रजीकडे

मराठीची अवकळा

मित्र जाती चहुकडे॥३॥


 करण्या आता जागर

जाऊया मराठीकडे

घेऊ दे मोकळा श्वास

जाऊ या संग्रामाकडे॥४॥


 सुरु आपल्यापासून

ध्यास हा मराठीकडे

टिकवू शाळा बालके

जा नवप्रगतीकडे ॥५॥


संस्क्रृतीचा मान ठेवू

माझिया शिक्षणाकडे

शाळा राखू वाढवू या

जाऊ सुसंस्काराकडे॥६॥


Rate this content
Log in