STORYMIRROR

Swarup Sawant

Romance

4  

Swarup Sawant

Romance

प्रेम

प्रेम

1 min
414

सूर्य ,चंद्र ,तारे साक्षीला

त्यांच्या अबोल हो प्रितीला

प्रेमी युगूल या जगाला

वंदिती अपार त्यागाला॥१॥


राधाकृष्णाच्या हो जोडीला

आगळ्यावेगळ्या प्रेमाला

ईशात्कारी अनुभुतीला

प्रणाम राधेच्या भक्तीला॥२॥


नटखट त्या बाळलिला

बासुरीच्या सुरावटीला

दहीदुधाला आसुसला

हंडी फोडण्या आसावला॥३॥


राधा राधा धावे हाकेला

विसरे ती देहभानाला

व्याकुळ प्रेमी मिलनाला

आदर्श सा-या युगुलांना॥४॥



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance