विषय -गरिबी
विषय -गरिबी
गरीब असून आनंदी
वेदना नसे मुखावर
कष्ट करणे हेचि ध्येय
जगणे जणू हातावर॥१॥
आसवांची हो पुश्पमाला
मेहनतीची ही भाकर
हात ना कधी पघळणे
आत्मभानी तो सुधाकर॥२॥
वाट पाही सूर्याेदयाची
विनवी ईशा जोडी कर
कष्टा दे तूचि माझ्या फळ
जाऊ दे जिवनाची कर॥३॥
सुखी राहो सारे संसारी
अवघ्या विश्वाचा हो भार
मनी इच्छा गरिबीतही
घेण्या तो सदैव तत्पर॥४॥
मन प्रसन्न सदा असे
उदार मतांचा सागर
चिंता जरी असे हो उरी
हास्य सदा हो मुखावर॥५॥
