विषय - पालक(नीती प्रेरणा पालक
विषय - पालक(नीती प्रेरणा पालक
जिवनाची नाव
यशाची प्रेरणा
नीतीचा हो पाठ
करिती शहाणा॥१॥
दु:ख ते सोसती
सुखाचा हो घाणा
अपुल्या बाळास
करती शहाणा॥२॥
घास नाही ओठी
सुखाचा उखाणा
घेऊनी करांसी
करिती शहाणा ॥३॥
पालक जरि ते
सत्य हेच जाणा
हितकारी तुझे
करिती शहाणा ॥४॥
त्रिवार हेचि सत्य
शिल्पकार जाणा
तुझिया जिवना
करिती शहाणा
