कोरोना.. कोरोना..
कोरोना.. कोरोना..
सांगतो मी माझं ऐकून घ्या ना
येणार नाही हा जीव पुन्हा,
नका पडू बाहेर करुन बहाणा
बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...
बाहेर नको जाऊ खबरदार
खाऊ नका पोलिसांचा मार
नका करू कोणी तो गुन्हा...
बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...
घरातच आनंदी आनंद
दुनिया सारी आहे बंद,
समजून सांगतो पुन्हा, पुन्हा
बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...
एकमेकांपासून राहा दूर सारे
जीवाची या सारे काळजी घ्या रे,
करु नका मुळीच स्पर्श कुणा...
बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...
कोरोनावर नाही या मुळी उपचार
त्रस्त डॉक्टर, पोलीस, सरकार,
कळू द्या हे लोकांना..
बाहेर आहे कोरोना, कोरोना, कोरोना...