STORYMIRROR

Sneha Bawankar

Inspirational Others

3  

Sneha Bawankar

Inspirational Others

सर्वात जास्त बळ कुणाला?

सर्वात जास्त बळ कुणाला?

1 min
250

आज पण प्रश्न पडतोय मला

वेळेला काय खरचं एवढा बळ दिला?

वेळ जीवनात आणतोय त्याला

जो आपल्या नशिबात नसतोच दिला


काय कमालच मन हो

अस्तित्व अजिबात नाही त्याला

पण या जीवनात मानतात की सर्वात जास्त बळ वेळेला दिला

यामुळे आजही विचार पडतो मला

अस्तित्व नसूनही काय खरच एवढा बळ आहे वेळेला?


जे नशिबात नसतं 

ते स्वप्नात का असतं

आणि जे शब्दात नसतं ,

पण वास्तविक का घडतं


हे बघता - बघता 

विचार पडतोय मला,

यांना बघून तर वाटत की

खरंच सर्वात जास्त बळ वेळेला दिला


हा विचार तर पटत असेल ना तुम्हाला

की या जीवनात सर्वात जास्त बळ कुणाला?

वेग येऊ द्या तुमच्या विचारांना

कारण हे विचार वेळेशी लढवतील तुम्हाला.


वेळ तर प्रत्येक सेकंदात घडतो

पण विचार तर प्रत्येक क्षणी बदलतो

विचार हा विभिन्न असतो

म्हणून तर मला विचारात जास्त बळ दिसतो


*तुम्हाला काय वाटतं?*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational