STORYMIRROR

Sneha Bawankar

Abstract Romance

3  

Sneha Bawankar

Abstract Romance

थंड हिवाळी रात्री

थंड हिवाळी रात्री

1 min
147

थंड हिवाळी आवारात

लागली मज तहान होती

पाण्याने ती भागेल कशी?

प्रश्न केला मी सख्यास राती


गुंफून वेणी दर्पण पुढेच

डोळ्यात माझ्या सजत होता

टिपून माझे नयन तुझ्यावर

म्हणाले तुम्ही कुठेच जाता.!


त्या हिवाळी सर्द रातीला

बर्फाचा ही वर्षाव झाला

सामावून घे मज तुझ्यात तू

हे कशी मी सांगू सख्याला


बसली होती अवकाश बघत मी

त्यात फक्त प्रेमाचा भास

कशी सांगू सख्या तुला मी

किती तू माझ्या हृदयाला खास


तुझ्या मिठीतले ते अवकाश होते

पण तुझ्या दुराव्याचा वेगळा त्रास

मी ही असेल तुझ्या मिठीत कधी

आता आहे फक्त तुझा आभास


त्या थंड हिवाळी रात्री फक्त

अश्रूंचा असेल विवाद

तुझ्या माझ्या प्रेमाचा

अग्नीसाक्षी करेल निनाद



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract