STORYMIRROR

Sneha Bawankar

Inspirational

3  

Sneha Bawankar

Inspirational

होळी मानसिकतेचे

होळी मानसिकतेचे

1 min
215

पूजा अर्चना करीत लोक

बसले आज चार चौघात

मात्र एक प्रश्न उठते नेहमी

हा बदल का फक्त सणात?


शिकण्यासारखं खूप काही

पण समजून कुणीच घेत नाही

दहन करून आपल्या बुध्दीचा 

कुणी मनात देव बसवत नाही


होळी आहे सण रंगांचा 

आपुलकी प्रेम वाढवण्याचा

कुविचारांच्या दहनाचा

आपल्या सर्वांच्या मनाचा


समजा प्रत्येक सणाचे महत्त्व

बुद्धी आहे तुमचा एक तत्व

प्रत्येक गोष्ट नावापुरती नाही

समजा त्या मागील सत्व


पण किंतू परंतु नको कधी

नेहमी ठेवा माणुसकीला मधी

होलिकेचा दहन आहे, 

नाही मानसिकतेची अंतिम विधी


रंगांनी सजवू आपले जीवन

अन् भिजवू त्यात सर्वांना

कळवू महत्त्व या सणाचे

फक्त समजावं हे जणांना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational