STORYMIRROR

Sneha Bawankar

Romance

3  

Sneha Bawankar

Romance

बघितला काय ?

बघितला काय ?

1 min
311

सर्वाचे मन जिंकणे हा स्वभाव त्याचा,

स्वप्नांतील दुनियेचा राजाचं जसा, 

बघितला काय कुणी असा?


स्पष्टत्वाची तो भाषा असा

तरीही रागाची तो अभिलाशा जसा,

बघितला काय कुणी असा?


प्रत्येकाच्या मनाचा तो दाता,

दयेचे वास्तविक रूपच जसा,

बघितला काय कुणी असा?


दुःखात हसवणारा,

स्वतःच्या शब्दांनी रडवणारा,

बघितला काय कुणी असा?


सौंदर्याचा तो प्रतिरूप कसा ,

शब्दांनी कुरुपला देतो स्वरूप जसा ,

बघितला काय कुणी असा?


मला स्वतःच्या शब्दांनी घडवणारा,

हातात हात पकडुन चालवणारा,

बघितला काय कुणी असा?


माझ्या या वेगळ्या स्वरूपाशी मिळवणारा,

प्रेमाची मला अनुभूती करवणारा,

बघितला काय कुणी असा?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance