STORYMIRROR

Sneha Bawankar

Inspirational Others

3  

Sneha Bawankar

Inspirational Others

माझ्या विचारातला बुद्ध

माझ्या विचारातला बुद्ध

1 min
354

चंदनापरी सुगंध

शब्द जणू फुलांचा गंध 

ओळी ऐकताच माणूस होतो स्तब्ध

कारण विचाराने बोलतो माझा बुद्ध

कर्म त्याचे पण धर्म नाही

विरंगांचा तो रंग

देव माझा नसूनही

आहे तूच माझ्या संग

घेतला पृथ्वीवर तू जन्म

करतो झाडाखाली विश्राम

लुंबिनी नावाच्या गावात घडला

तुझ्या विचारांचा चमत्कार.

दिला विचारांनी जगाला आकार

जसा तू या जगाचा मूर्तिकार

रंगही त्यात परिश्रमाचा

जसा इंद्रधनुष्य सप्तरंगांचा

नाही तू देवाचा अवतार

पण देवाप्रमाने सर्व केले साकार

नाही तुझ्यात कटो-काटीचे संस्कार

धैर्याला मिळतो तुझ्या शब्दाचा आधार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational