Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sneha Bawankar

Inspirational

3  

Sneha Bawankar

Inspirational

मी तरुण भारताची..!

मी तरुण भारताची..!

1 min
206


मी तरुण भारताची 

स्वतःला शोधत निघाली

दुसऱ्याला बघून स्वतःची 

इच्छाच नाहीशी झाली.


जग बघता-बघता

खूप दूर निघून आली

बघून वेडावाकडा रस्ता

स्वतःची वाट शोधत हरवली


क्रोधवान मी

विचारात्मक झाली

काव्य लिहिता-लिहिता

स्वतःच्या जवळ मी आली


जगण्या यौवन आले पण

मजा नाहीशी झाली

स्वप्न स्वत:ला घडविण्याचे बघून

थोडी स्वार्थी मी झाली


मी तरुण भारताची

स्वप्न घेऊन आली

इथेच घडवून स्वतःला

नव्या वाटेला निघाली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational