STORYMIRROR

Sneha Bawankar

Others

3  

Sneha Bawankar

Others

कोण आहे मी ?

कोण आहे मी ?

1 min
163

कोण आहे मी 

जी चेहऱ्याने हसते,

की ती मुलगी 

जी मनातच रडते.


कोण आहे मी

जी दुसऱ्यांच्या मनाला छळते,

की ती मुलगी

जी स्वतःच दुसऱ्यांच्या विचारांनी धडपडते.


कोण आहे मी 

जी वाईटाच्या संगतीत वळते,

की ती मुलगी

जी स्वतःच्या विचारांनी घडते.


कोण आहे मी

जी दुसऱ्याचे शब्दप्रत उतरवते,

की ती मुलगी

जी स्वतःच्या विचारांना काव्यात घडवते.


कोण आहे मी

जी व्यक्तींशी खेळते,

की ती मुलगी 

जी व्यक्तींच्या खेळामुळे छळते


कोण आहे मी

जी सौंदर्याला सर्वस्व मानते,

की ती मुलगी

जी विचारांना सौंदर्यात दाटते


कोण आहे मी

जी व्यक्तींशी खेळते,

की ती मुलगी

जी व्यक्तींच्या खेळामुळे छळते.


कोण आहे मी

जी फक्त शब्दांनी गोड वाटते,

की ती मुलगी

जी लेखणीतून शब्दांचा खेळ मांडते.


कोण आहे मी

आता स्वतःलाच कळेनासे वाटते,

विचारांनी सळसळणारी मी

आता स्वप्नात हरवलेली वाटते.


Rate this content
Log in