STORYMIRROR

Sneha Bawankar

Others

4  

Sneha Bawankar

Others

*आजचा स्वतंत्रता दिवस*

*आजचा स्वतंत्रता दिवस*

1 min
275

आज स्वतंत्रता दिवस आला

पण बाहेर जाण्याची अनुमती नाही कुणाला

कसा हा दिवस देवाने दाखवला!

जिथे घरचं सर्वांसाठी पिंजरा झाला.


चाहूल आम्हा लेकरांची

निघाली शोधत वाटेला

पण वाट काही मिळाली नाही

आम्हा चिमुकल्या पावलाला

बालपणी बोट पकडून

न्यायचे बाबा शाळेला

जिथे झेंडा फडकतांना बघून

सुखाचे अश्रू यायचे डोळ्याला


स्वप्न घेऊन डोळ्यात

निघायची मी शाळेला

की कधीतरी झेंडा फडकविण्याची

मिळेल संधी मला

या भारत मातेपोटी

अनेक नवयुवकांनी जन्म घेतला

सौभाग्य आहे माझे

की त्या भारतमातेनी मलाही जन्म दिला


पण आजचा हा स्वतंत्रता दिवस

माझा घरीच निघून गेला

आज शोधत बसली शाळाही

त्या चिमुकल्या पाखराला

अनेक ठिकाणी आज झेंडा फडकला

पण टाळ्यांचा तो आवाज नाहीसा झाला

देशप्रेमी अडकले आज त्यांच्याच घराला

आज घरूनच देते स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा सर्वाला.


Rate this content
Log in